चाळीसगाव एज्यूकेशन सोसायटी चेअरमनपदी नारायणभाऊ अग्रवाल

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमनपदी नारायणभाऊ अग्रवाल यांची निवड करण्यात आली असून त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात मोलाचे स्थान असणार्‍या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली होती. यात प्रगती पॅनलला बहुमत मिळाले होते. यानंतर आज संस्थेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी मॅनेजिंग बोर्डाच्या चेअरमनपदी संस्थेचे जेष्ठ संचालक नारायणभाऊ अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या कायालयात चेअरमनपदाच्या निवडीबाबत आज रोजी सकाळी ११ वाजता नूतन अध्यक्ष आर. सी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला मॅनेजिंग बोर्डाच्या चेअरमनपदासाठी नारायणभाऊ अग्रवाल यांच्या नावाचा प्रस्ताव प्रदिप अहिरराव यांनी मांडला. त्यास अनुमोदन मु. रा. अमृतकार यांनी दिले. तर डॉ. सुनील राजपूत यांच्या नावाचा प्रस्ताव बाळासाहेब चव्हाण यांनी मांडले त्यास अनुमोदक भूषण ब्राम्हणकर यांनी दिले.

त्यानंतर हात उंचावून झालेल्या मतदानात नारायणभाऊ अग्रवाल यांना बोर्डाच्या चेअरमनपदासाठी १४ तर डॉ. सुनिल राजपूत यांना ४ मते मिळाली. यात नारायणभाऊ अग्रवाल यांना बहुमत मिळाल्याने त्यांची सर्वानुमते चेअरमनपदी निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.

दरम्यान, चेअरमनपदी नारायणभाऊ अग्रवाल यांनी निवड जाहीर झाल्यानंतर त्यांचा नवनिर्वाचीत संचालकांतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार देखील स्वीकारला.

Protected Content