जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दिव्यांग सेनेच्या वतीने दिव्यांग सेना महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भावनात मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आला.
याप्रसंगी दिव्यांग बांधवांनी सामाजिक, शैक्षणिक, कलावंत, आरोग्य यासह इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल दिव्यांग बांधवांचा जळगाव जिल्हा दिव्यांग सेनेच्या वतीने विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी … यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार वितरण कार्यक्रमात दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सचिव भरत जाधव आणि जिल्हाध्यक्ष दत्तात्रय महाजन यांनी दिव्यांग सेनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा सांगितला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश तायडे, ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप चव्हाण, भीमराव मस्के, मुमताजीम खान, मुजाहिद पिंजारी, शकील शेख, गणेश पाटील यांच्यासह दिव्यांग सेना मित्र परिवाराचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.