जळगावात मनियार बिरादरीत ऐतिहासिक अनोखा विवाह

manitar biradari

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीतर्फे रसलपूर येथील प्रगतीशिल ६५ वर्षीय महेमुद शेख व शहरातील शनीपेठेतील ५० वर्षीय वहिदाबी यांचा ऐतिहासिक अनोखा विवाह अरबी मदरशांमध्ये नोंदविला गेला. जळगाव शहरात नव्हे तर राज्यात नोंद होईल होईल असा एक ऐतिहासिक क्षण मंगळवारी संध्याकाळी जळगाव मन्यार बिरादरीच्या मानियार वाड्यात घडला.

वडिलांच्या विवाहसाठी मुलाकडून प्रस्ताव
रसलपुर येथील प्रगतिशील शेतकरी शेख महेमूद अब्दुल गनी वय ६५ यांच्या पत्नीचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू झाला. शेख महेमुद यांना तीन मुले व पाच मुली सोबत तेरा नातवंड असा मोठा परिवार आहे. तिघा मुलांचे व पाच ही मुलींचे लग्न झाल्याने ते आपापल्या संसारामध्ये सुखी समाधानी आहे. रसलपुर येथे शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेख महेमुद आपल्या मुलांसोबत जळगाव येथे राहू शकत नसल्याने त्यांच्या सोबत कौंटमबीक अडचणी येत असल्याचे लक्षात घेता त्यांच्या तिन्ही मुलांनी शेख रमजान वय ४३, शेख असलम वय ४० व शेख रईस वय २६ यांनी आपल्या वडिलांसाठी जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, रउफ टेलर व अख्तर शेखकडे प्रस्ताव दिला. यात तलाकपीडित अथवा विधवा 50 वर्षावरील महिला असल्यास आमच्या वडिलांचे निकाह लावून देण्याचा प्रस्ताव दिला होता.

बिरादरीकडील सर्व्हे मधील नोंदी
सदर बाबीचे बिरादरीने कौतुक व स्वागत करून त्वरित बिरादरीकडील सर्व्हे रजिस्टर तपासून बघितले असता जळगाव शनिपेठ येथील 50 वर्ष वयाची वहिदाबी वल्द सैयद अहेमद ही आपल्या मोठया भावाकडे अब्दुल मुतललीब सय्यद अहमद यांच्याकडे राहत असून तिचे पहिले पती मयत तर दुसऱ्या पतीने तलाक दिल्याने ती पीडित होती.

वधूच्या नातेवाईक सोबत चर्चा व दोघांची संमती
सदर प्रकरणी फारूक शेख, सैयद चाँद यांनी अब्दुल मुतललीब यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी बहिणीची संमती घेतली व दोघी वर वधू व घराचे मंडळी ची संमती मिळाल्याने हा आगळावेगळा अत्यंत महत्त्वाचा इस्लामी शरीयत नुसार नीकाह ची तयारी अवघ्या दोन तासात झाली.

निकाहची कार्यवाही
मौलाना शफिक पटेल नायब इमाम, अकसा मस्जिद मेहरून यांनी सैयद चाँद यांच्या नेतृत्वाखाली (वकील) तर वर शेख महेमुद यांची दोन्ही मुले शेख रमजान व शेख असलम यांच्या साक्षीने खुतब ए नीकाहचे पठन केले. वकील सैयद चाँद यांनी प्रथम वधूची संमती घेऊन तीस १७ तोळे सुवर्ण अलंकार दिले नंतर मौलानाने वरास कबूल है-कबूल है-कबूल हैची संमती घेऊन दुआ केली व हा विवाह संपन्न झाला.

ऐतिहासिक निकाहला यांची होती उपस्थिती
वरा तर्फे निकाह लावताना त्यांची तिन्ही मुले, सुना व नातवंडे सोबत मोजके नातेवाईक तर वधूतर्फे भाऊ मूतललिब, बहिण शाफिया व भाची सईदा, यांच्यासह लालबाग हुन आलेले आबीद शेख व समद शेख, साकळीचे असलम सर, मुंबईचे कलीम शेख, नशिराबादचे मुख्तार सय्यद, जळगाव चे फारूक शेख,सैयद चाँद, ताहेर शेख, रउफ टेलर, इस्माईल फकीरा, हारून महेबुब,अख्तर नियमातूल्लाह, फारूक टेलर, सादिक अहेमद, रहमतुल्ला टेलर, अल्ताफ शेख, खलील बक्ष, सादिक कासम, रफिक मजिद, रफिक वायरमन, रफिक शफि, जरीना रउफ, रुबीना अख्तर, फरिदा कलीम, फर्जाना रहमतुल्ला, सईदा सय्यद, नसीम सय्यद, सैनिला असलम, सोफिया शेख, सौ शबनम शेख ,आदी उपस्थित होते.

मुलांनी करून दिली नोटरी वडिलांचे वय ६५ वर्ष असल्याने व नवीन आईचे वय 50 वर्ष असल्याने वराच्या नावे शेती असल्याने मुलांनी बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्याकडे नोटरी करून दिले की भविष्यात वडिलांना काही कमी-जास्त झाल्यास वडिलांची प्रॉपर्टी आईच्या नावाने राहील व आम्ही तिचा सांभाळ करू व तिला ती हयात असेपर्यंत तिला सुखी ठेउ असे हमीपत्र लिहून दिले.

शहर ए काझी तर्फे उपक्रमाचे कौतुक
सदर निकाहची बाब जळगावात वाऱ्या सारखी पसरली असता सर्व प्रथम दारुल कझा चे प्रमुख व शहर-ए-काझी मुफ्ती अतिकुर रहेमान यांनी अत्यंत भावुक होऊन बिरदारीची स्तुती करून मुस्लिम समाजाला चालना देणारा स्तुत्य उपक्रम मन्यार बिरादरीने राबविल्याबद्दल मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख व त्यांचे सर्व सभासद यांचे कौतुक केले.

Protected Content