यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली गावातील विकासकामांच्या उदघाटनाच्या वेळी आपण कोर्टाच्या कामानिमित्त बाहेर होतो. यामुळे कुणी याबाबत गैरसमज करू नये असे आवाहन सरपंच विलास अडकमोल यांनी केले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, कोरपावली तालुका यावल या ग्राम पंचायत अंतर्गत १५ व्या वित्तीय निधीतुन वार्ड क्रमांक३ आणी मध्ये पेव्हर ब्लॉक सह आदी विकास कामांचा नुकताच शुभारंभ झाला. याप्रसंगी सरपंच अनुपस्थित असल्याने गावात चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, आमच्या भगिनी व भाझ्या सहकारी उपसरपंच हमीदा पटेल यांच्या व सदस्यांच्या हस्ते कामांचे भूमिजन झाले. मात्र आपण न्यायलयाच्या कामात व्यस्त असल्याने त्या कार्यक्रमास उपस्थित राहु शकलो नाही. त्यामुळे कुणाच्या ही मनात शंका घेण्याचे काही ही कारण नाही गावाच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही सर्व विद्यमान सन्मानीय सदस्य एकत्र आहोत याबाबत माझ्या कार्यक्रमा प्रसंगी अनुपस्थितीच्या संदर्भात शंका निर्माण करून तर्कविर्तक लावण्याचे काहीही कारण नाही असे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.
कोरपावली गावाचा विकास हाच आपला श्वास आहे. यासाठी आम्ही कटीबध्द असून याबाबत कुणीही माझ्या उदात्त हेतूवर संशय घेऊ नका असे त्यांनी सांगितले. तर गावातील उर्वरित विकासकामांना लवकरच वेग दिला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.