Home Cities एरंडोल पद्मालय देवस्थान तीन दिवस दर्शनासाठी बंदच

पद्मालय देवस्थान तीन दिवस दर्शनासाठी बंदच

0
42


जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे पद्मालय देवस्थानाचा त्रिपुरारी यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून मंदिर तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता पद्मालय देवस्थान येथे त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी होणारा यात्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, आजपासून २९ व ३० नोव्हेंबर, १ डिसेंबर असे तीन दिवस पद्मालय देवस्थान बंद राहणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने कळवले आहे. पद्मालय येथे श्री गणेशजींची पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्रिपुरारी पौर्णिमेला संपूर्ण खान्देशातून भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पूर्ण करण्यासाठी त्रिपुरारी पोर्णिमेला पद्मालय येथे मोठा यात्रा उत्सव होतो. मात्र यंदा हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound