अवधूत गुप्तेंनी घेतली महाजन दाम्पत्याची दिलखुलास मुलाखत

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | दिवाळी पाडवा संध्या स्वर कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी ना. गिरीश महाजन व सौ. साधना महाजन यांची  दिलखुलास मुलाखत घेवून महाजन दाम्पत्यांची राजकीय तसेच कौटुंबिक विविध पैलू उघड केलेत.

 

 

अवधूत गुप्ते यांनी ना. गिरीश  महाजन यांना, तुम्ही चालू सरकारच्या राजकीय घडामोडीमध्ये किती सहभाग होतात असा प्रश्न केला.  त्यावर त्यांनी उत्तर दिले मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार काम करत असतो व यामध्ये थोडा खारिचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर जामनेरमध्ये भव्य क्रीडा संकलन होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  त्यांनी फिटनेस व व्यायामाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन केले.  सौ. साधना महाजन यांनी सांगितले की, नामदार गिरीश महाजन यांनी परिवाराला वेळ द्यावा व स्वतःची काळजी घ्यावी.  नामदार महाजन यांनी यावेळी त्यांचा राजकारणातील जीवनप्रवास उलगडून दाखविला.

 

Protected Content