Home Cities जळगाव भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव नियोजन समिती गठीत

भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव नियोजन समिती गठीत

0
59


जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७  व्या जयंतीच्या नियोजनासाठी पद्मालय, शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच बैठकीचे आयोजन कण्यात आले होते.  या बैठकीत भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव नियोजन समिती २०२२ स्थापन करण्यात आली.

 

बैठक आ. राजू मामा भोळे,  मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, मनपा सभागृह नेते  ललित कोल्हे,  शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सुनील भंगाळे,   नगसेवक डॉ. वीरन खडके, पिंटू काळे,  कुंदन काळे,  अजित राणे, चंदन कोल्हे,  प्रदीप भोळे, संजय पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.

बैठकीत ३१ ऑक्टोबर रोजी भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७  व्या जयंतीनिमित्त शोभा यात्रा काढणे व त्यामध्ये त्यांच्या जीवन परिचयावर सजीव आरास आदींबाबत  नियोजन करण्यात आले. यावेळी शोभा यात्रेचा मार्ग प्रारंभ:- शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नेहरू चौक, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल टॉवर जळगाव शहर महानगरपालिका येथे समारोप. तसेच समाज प्रबोधनावर व्याख्यानमाला घेण्यात येणार आहे. या बैठकीत भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव नियोजन समिती 2022 स्थापन करण्यात आली.

सल्लागार समिती-  राजू मामा भोळे,  जयश्री महाजन, ललित कोल्हे,  सुनील महाजन, विष्णू भंगाळे, लक्ष्मीकांत चौधरी, मनोज चौधरी, श्री ललित भैय्याभाऊ चौधरी,  सुनील भंगाळे,  नारायण खडके, दीप्ती  चिरमाडे, अध्यक्षा बहिणाबाई ब्रिगेड,  उज्वला बेंडाळे, पिंटू काळे, डॉ. विरन खडके, शेखर आत्तरदे, कुंदन काळे, अमित काळे, प्रदीप भोळे,  परेश  कोल्हे, चंदन  कोल्हे, प्रवीण कोल्हे, अजय बढे, मनोज वारके, संजय पाटील, गोपाळ खडके, महेंद्र पाटील, सर्व ज्येष्ठ नेते व पदाधिकारी

 

नियोजन समिती अध्यक्षपदी ललित चौधरी, कार्याध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्षपदी भूषण भोळे, लतेश चौधरी, निखिल रडे, शंतनू नारखेडे, योगेश काळे, सचिव सुनील बंटी भारंबे, उपसचिव मिलिंद चौधरी, कोषाध्यक्ष श्री महेश चौधरी, उपकोषाध्यक्ष चैतन्य कोल्हे, ललित खडके.

समिती सदस्य पद,  पियुष कोल्हे, विशाल भोळे,  प्रशांत धांडे, पंकज बोरोले, अमोल धांडे, सुरेंद्र कोल्हे, दीपक धांडे, शुभम पाटील, प्रशांत चौधरी, गौरव कोल्हे, राहुल तळले, सुरज नारखेडे, यावेळी ललित कोल्हे, सुनील महाजन,  सुनील  भंगाळे यांनी २५  सदस्य कार्यकारणी जाहीर केली व सर्व कार्यकारिणीचे अध्यक्ष यांचे कार्याध्यक्ष यांचे बुके देऊन स्वागत केले  राजू मामा भोळे, यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी वरून संपर्क साधून अभिनंदन व स्वागत केले व शोभायात्रा खूप मोठ्या जल्लोषात साजरी करावी यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

 


Protected Content

Play sound