जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनीतील ख्वाजामिया दर्गाजवळ असलेल्या पल्स पॅथॉलॉजी येथून दोन जणांचे दोन मोबाईल लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिद्धार्थ कैलास रायमळे (वय-३०) रा. अर्जुननगर, हरीविठ्ठल नगर, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून तो गणेश कॉलनीतील ख्वॉजामिया दर्ग्याजवळ असलेल्या पल्स पॅथॉलॉजी येथे नोकरीला आहे. सोमवार १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ७.१५ वाजेच्या दरम्यान सिद्धार्थ रायमळे व सोबत काम करणारा दिपक कोळी यांचे दोन महागडे मोबाईल चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केले. परंतु दोन्ही मोबाईल कुठेही आढळून आले नाही. अखेर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तेजराव घोडेकर करीत आहे.