Home क्राईम कोरोना : आज जिल्ह्यातून ४७ रूग्णांची कोरोनावर मात; २४ रूग्ण बाधित आढळले

कोरोना : आज जिल्ह्यातून ४७ रूग्णांची कोरोनावर मात; २४ रूग्ण बाधित आढळले

0
100


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात एकुण २४ कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर ४७ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहे. आज जिल्ह्यातील सात तालुके निरंक रूग्ण संख्या दिसून आली आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर- ५, जळगाव ग्रामीण, ०, भुसावळ-२, अमळनेर-१, चोपडा-१, पाचोरा-१, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्हे -१ असे एकुण २४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ७६२ कोरोना बाधित आढळले आहे. त्यापैकी ४८० रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे, तर ५२ हजार ९७७ रूग्णांची कोरोनावर मात केली आहे. आज जळगाव शहर आणि पाचोरा तालुक्यात प्रत्येकी एक असे दोन रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound