एरंडोल येथे आयशर आणि इकोची समोरासमोर धडक : दोन ठार ; सहा जखमी

एरंडोल प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणारा आयशर ट्रक आणि मारुती इको यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत चालकासह एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले.

सुत्रांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रक आणि कार समोरा-समोर धडकल्या. जळगावकडून धुळ्याकडे घेऊन जाणार्‍या ट्रकने (क्र.एम.एच.४३-वाय.०२३८) धुळ्याकडून जळगावकडे येणार्‍या एम.एच.१९-व्ही.९२५७ क्रमांकाच्या कारला धडक दिली. या अपघातात कारचालक बाळा (पूर्ण नाव नाही, रा.बिलवाडी, ता.जळगाव) व धनराज बाविस्कर (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे दोघे जागीच ठार झाले. तर ज्योती रवींद्र शिंदे (वय ३७), ललित रवींद्र शिंदे (वय २९, दोन्ही रा.एरंडोल), जयश्री धनराज बाविस्कर, भारती किरण जाधव, आशुतोष बाविस्कर, सुमनबाई मोतीलाल शिंदे हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातून लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रथमोपचार झाल्यानंतर त्यांना जळगावला पाठविण्यात आले आहे. तर अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

 

Protected Content