पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | निपाणे प्रकरणात कोणीही दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करु नये, पोलिस प्रशासन व न्याय देवतेवर विश्वास ठेवावा, अशी माहिती आ. किशोर पाटील यांनी आज शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
निपाणे ता. पाचोरा येथे एका दलित समाजाच्या महिलेचा अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीमध्ये करण्यास मज्जाव केल्याची घटना दि. १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. ही घटना अतिशय निंदनीय असुन या प्रकरणातील संशयित ११ आरोपींविरुद्ध पाचोरा प्रशासनाने कुठल्याही दबावाखाली न येता. ११ संशयित आरोपींविरुद्ध अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल केलेला आहे.
मात्र काही समाज बांधव या प्रकरणास वेगळे वळण देऊन वारंवार प्रशासनास निवेदन देऊन आपली पोळी भाजण्याचे काम करत असुन त्यांनी तसं करु नये. या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या कडे असुन ते आपले काम योग्य पद्धतीने करत आहेत. अशी माहिती पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी आज दि. २४ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी मुकुंद बिल्दीकर, युवानेते सुमित किशोर पाटील, प्रविण ब्राह्मणे, समाधान पाटील, दिपक पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, निपाणे ता. पाचोरा येथील दलित महिलेचा अंत्यविधी हा स्मशानभूमीत होवु देण्यास मज्जाव करण्यात आला होता. या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील सह १० आरोपींविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये कोणाच्याही दबावाखाली न येता पोलिसांनी अॅल्ट्रासिटीचा गुन्हा हा ११ संशयित आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्याकडे आहे. या प्रकरणात पोलिस प्रशासन योग्य तपास करीत असुन या प्रकरणी काही राजकारणी वारंवार निवेदने देऊन आंदोलन करुन आपली पोळी भाजण्याचे तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. आरोपींवर रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अॅल्ट्रासिटीच्या गुन्ह्याचा तपास हा पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या कडे असुन या प्रकरणात न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे पोलिस प्रशासन व न्यायालय हे आपले काम योग्य पद्धतीने करीत असुन पोलिस प्रशासनावर तसेच न्याय देवतेवर विश्वास ठेवावा. असेही आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.