Home क्राईम ब्रेकींग : वीज कोसळल्याने बापलेकाचा मृत्यू

ब्रेकींग : वीज कोसळल्याने बापलेकाचा मृत्यू


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या पित्यासह मुलावर अचानक वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना तालुक्यातील न्हावे गावात आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुदैवाने महिला बचावल्या आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील न्हावे गावातील आबा शिवाजी चव्हाण (वय-४५) हे वरील ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून त्यांची न्हावे शिवारात शेतजमीन आहे. त्यात यंदा कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार आज शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी आबा चव्हाण, पत्नी (नाव माहित नाही) व मुलगा दीपक आबा चव्हाण (वय-१४) हे शेतातील कापसाला खत घालण्यासाठी गेलेले होते. त्यात दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लागल्याने तिघेजणे शेतातल्या शेवगाच्या झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत आबा चव्हाण आणि मुलगा दिपक आबा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत महिला थोडक्यात सुदैवाने बचावल्या आहे. या घटनेने चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मयताच्या पाश्च्यात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे न्हावे गावात शोककळ पसरली आहे.


Protected Content

Play sound