Home Cities जळगाव कोळी समाजबांधवांच्या जात प्रमाणपत्राची समस्या सोडवा : खा. रक्षा खडसे

कोळी समाजबांधवांच्या जात प्रमाणपत्राची समस्या सोडवा : खा. रक्षा खडसे

0
50

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोळी समाजबांधवांना आदिवासी टोकरे कोळी हे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आज खासदार रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

या संदर्भातील वृत्त असे की, जिल्हा आदिवासी टोकरे कोळी जमात पदाधिकार्‍यांनी आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे भेट घेऊन जात प्रमाणपत्र तसेच इतर अनेक समस्यांबाबत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

रावेर लोकसभा क्षेत्रातील आदिवासी टोकरे कोळी जमात पदाधिकार्‍यांनी दोन दिवसा आधी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची कोथळी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना कोळी समाज बांधवांना शैक्षणिक व शासकीय कामकाजात येणार्‍या जात प्रमाणपत्राच्या अनेक समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्याअनुषंगाने आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनांत अप्पर जिल्हाधिकारी तसेच अमळनेर, भुसावळ व फैजपूर चे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांच्या व आदिवासी टोकरे कोळी जमात पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत आदिवासी टोकरे कोळी जमात विद्यार्थी व नागरिकांना येणार्‍या अडचणीबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी तसेच उपस्थितीत प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सविस्तर माहिती देऊन सदर अडचणी सोडविणे बाबत समस्त आदिवासी कोळी समाजाच्या वतीने निवेदन दिले.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी तसेच अमळनेर, भुसावळ व फैजपूर चे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांच्यासह अशोक नामदेव कांडेलकर, पुरुषोत्तम कोळी, हरलाल रमेश कोळी, चंद्रकांत तोताराम भोलाणे, शांताराम तोताराम सपकाळे, रंगराव सिताराम देवराज, वनायक दुर्योधन कोळी, आत्माराम सुपडू कोळी, ईश्वर(बंडू) अशोक कोळी, पंकज सुधाकर कोळी, गुणवंत शामराव पिवटे, छगन सिताराम देवराज, गोपाळ यशवंत कोळी, संदीप शिरसाळे, अशोक चिंतामण शिरसाळे, भिका कडू सोनवणे, संजय पांडुरंग सपकाळे, सागर नामदेव कोळी, गोपाल यशवंत देवराज ई. उपस्थित होते.


Protected Content

Play sound