Home क्राईम रिक्षाच्या धडकेत अपघातात दुचाकीस्वार जखमी

रिक्षाच्या धडकेत अपघातात दुचाकीस्वार जखमी

0
19


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रिक्षा चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. परिणामी, दुचाकी घसरून तरुण जखमी झाल्याची घटना आज गुरूवार १ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली.

या तरुणाच्या डोक्याला व शरीराला जबर दुखापत होऊन त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राहुल गवरलाल पाटील (वय २७) रा. रिधुर ता. जळगाव असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो शहरातून इच्छादेवी चौकाकडे जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ पुढे जात असलेल्या रिक्षा चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. परिणामी दुचाकीस्वार राहुल पाटील याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला तर शरीराला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली.

नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले.


Protected Content

Play sound