Home धर्म-समाज ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य

ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य

0
31

पाचोरा  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबायांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक आणि जेष्ठ संपादक संजय भोकरे यांनी स्व. नामदेव भोसले यांचे बंधू उद्धव भोसले आणि भोसले यांच्या कुटुंबियांच सांत्वन करून संघटनेकडून पन्नास हजारांचे अर्थसहाय्य दिले.

 

कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटने कडून पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. तसेच एस. बी. जी. आय. शिक्षण संस्थेच्या जर्नालिझम विभागामार्फत पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे यावेळी जेष्ठ संपादक संजय भोकरे यांनी जाहीर केले.  याप्रसंगी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा संघटक प्रकाश कांबळे, जेष्ठ पत्रकार दिगंबर शिंदे, सदानंद औन्ध्ये, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र कांबळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष अर्जुन यादव, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज शहर अध्यक्ष गणेश आवळे, मिरज शहर पत्रकार संघटनेचे सचिव शरद सातपुते व संकेतराज बन्ने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound