मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य विधीमंडळाचा कालावधी ठरला असून आज याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
बहुप्रतिक्षित विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. १७ ते २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. पावसाळी अधिवेशन हे १८ जुलै रोजी सुरू होईल असे घोषित करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, १७ ऑगस्टपासून सुरु होणार्या अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या अंबादास दानवे आणि अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाला स्थान मिळालेलं नाही. तिथे शिंदे गटाला स्थान देण्यात आलं आहे.