मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये बाविस्कर व देशपांडे यांचा समावेश

नवी मुंबई प्रतिनिधी । मनसेतर्फे आज जाहीर करण्यात आलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये जिल्ह्यातून माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर आणि ज्येष्ठ पदाधिकारी अ‍ॅड. जमील देशपांडे यांची निवड करण्यात आलेली आहे.

मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने वाशीत मेळाव्याला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा होत असून त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतरही नेते उपस्थित आहेत. त्यामध्ये पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर झाली असून, त्यांच्यावर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या शॅडो कॅबिनेटमध्ये माजी आमदार अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांच्याकडे ग्रामविकास विभागाची तर अ‍ॅड. जमील देशपांडे यांच्याकडे गृह, विधी व न्याय या विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत ते काम पाहणार आहेत.

दरम्यान, मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये खालील नावांचा समावेश करण्यात आला आहे.

गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन-
बाळा नांदगावकर
किशोर शिंदे
संजय नाईक
राजू उंबरकर
राहुल बापट
अवधूत चव्हाण
प्रवीण कदम
योगेश खैरे
प्रसाद सरफरे
डॉ. अनिल गजने
अ‍ॅड. रवींद्र पाष्टे
अ‍ॅड. जमील देशपांडे
अ‍ॅड. दीपक शर्मा
अनिल शिदोरे – जलसंपदा

मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-
अनिल शिदोरे
अमित ठाकरे
अजिंक्य चोपडे
केतन जोशी

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-
नितीन सरदेसाई
हेमंत संभूस – (उद्योग)
वसंत फडके
मिलिंद प्रधान
पीयूष छेडा
प्रीतेश बोराडे
वल्लभ चितळे
पराग शिंत्रे
अनिल शिदोरे – वित्त व नियोजन

महसूल आणि परिवहन-
अविनाश अभ्यंकर
दिलीप कदम
कुणाल माईणकर
अजय महाले
संदीप पाचंगे
श्रीधर जगताप

ऊर्जा-
शिरीष सावंत
मंदार हळबे
सागर देव्हरे
विनय भोईटे

ग्रामविकास-
अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर
अमित ठाकरे
परेश चौधरी
प्रकाश भोईर
अनिल शिदोरे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-
संजय चित्रे
अमित ठाकरे
वागिश सारस्वत
संतोष धुरी
आदित्य दामले
ललीत यावलकर

शिक्षण-
अभिजीत पानसे
आदित्य शिरोडकर – उच्च शिक्षण
सुधाकर तांबोळी
चेतन पेडणेकर
बिपीन नाईक
अमोल रोग्ये

कामगार-
राजेंद्र वागस्कर
गजानन राणे
सुरेंद्र सुर्वे

Protected Content