जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आज मंगळवारी, दि. ९ ऑगस्ट रोजी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने नशिराबाद येथील समर्थकांनी रात्री ८ वाजता फटाके फोडून जल्लोष केला.
महाविकास आघाडीचे सरकार असतांना आमदार गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले होते. दरम्यान, शिंदे गटात सामिल झाल्यानंतर मंगळवारी, ९ ऑगस्ट रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी नशिराबाद येथील बसस्थानक आवारात फटाके फोडून एकच जल्लोष केला.
याप्रसंगी माजी ग्रामपंचातय सदस्य तथा कामगार सेनोचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप साळे, दीपक जावरे, मनोज राजपूत, विशाल झोपे, अरून भोई, किरण बिऱ्हाडे, योगेश साळी, आसिफ खान, विशाल मोरे, लक्ष्मण तायडे, अनिल धनगर, शामा भोई, मरदाने भोई, प्रविण कोळी, बंटी बिऱ्हाडे, अनिल शिंदे, सोपान रंधे, लक्ष्मण रगडे, पिंटू धनगर, अनिल यशवंत, धनगर सागरनाथ यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.