Home Cities भुसावळ भुसावळच्या उपनगराध्यक्षपदी रमेश नागराणी

भुसावळच्या उपनगराध्यक्षपदी रमेश नागराणी

0
97

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य रमेश नागराणी यांची निवड आज झालेल्या विशेष सभेत करण्यात आली आहे.

शे. सईदा शफी यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले होते. या अनुषंगाने आज उपनगराध्यक्षपदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार दिपक धिवरे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे,गटनेते मुन्ना तेली, ज्येष्ठ सदस्य मनोज बियाणी, युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, राजू सूर्यवंशी आदींसह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.

या सभेत रमेश नागराणी यांची उपनगराध्यक्षपदी एकमताचे निवड करण्यात आली. आगामी नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका निवडणूक होणार असून यापैकी नागराणी यांना तीन महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती त्यांनी आज दिली.


Protected Content

Play sound