स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त धरणगावात सायकल रॅलीचे जोरदार स्वागत

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा नियोजन मंडळ, एनसीसी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या विद्यामानाने जळगाव ते अमळनेर ७५ किलोमीटर सायकल रॅलीचे धरणगाव बसस्थानकाजवळ आज स्वागत करण्यात आले.

आज मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जळगाव ते अमळनेर ७५ किलोमीटर सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहरातील पी.आर.हायस्कूल व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इंदिरा गांधी विद्यालयाच्या स्काऊट, गाईड पथकाची उपस्थिती दिली.

या रॅलीत महाराष्ट्र बटालियनचे कमंडींग ऑफिसर कर्नल प्रवीण धीमन, कर्नल विवेक भटारा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, नुतन मराठा महाविद्यालयाचे लेफ्टनंट शिवराज पाटील, एम.जे कॉलेजचे प्रा.मनोज बोरसे, विनोद पाटील, नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डागर यांच्यासह आदी सायकलस्वार यांनी सहभाग नोंदविला

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त ७५ किलोमीटरच्या प्रवासाचे नियोजन करत रॅलीने जळगाव शिरसोली, म्हसावद, एरंडोल, धरणगाव, अमळनेर असा सायकल प्रवास केला. सायकल रॅलीच्या स्वागतासाठी धरणगाव महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. किशोर पाटील, पी.आर.हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, इंदिरा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एस पाटील, एनसीसी विभाग प्रमुख मेजर डॉ अरुण वळवी, एनसीसी विभाग प्रमुख चीफ ऑफिसर डी.एस.पाटील, पर्यवेक्षक कैलास वाघ, बापू शिरसाठ, डॉ.कांचन महाजन, डॉ.संजय शिंगाणे, भारती बागुल, एस.पी.मनुरे, पी.डी. कोळी, डॉ.गौरव महाजन यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे कल्पना पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस.पाटील, बालकवीचे मुख्याध्यापक जीवन पाटील हे उपस्थित होते.

Protected Content