संजय गरुड यांच्या प्रयत्नाळमुळे कर्ज माफीस पात्र शेतकर्‍यांच्या प्रलंबित याद्या जाहीर

शेंदुर्णी , ता. जामनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय गरूड यांनी पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यातील २२ विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या यादीला मंजुरी मिळाली आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीचा क्रांतिकारक निर्णय घेऊन थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली व त्यासाठी निधींची तरतूद पण केली त्यानुसार शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळून यादी जाहीर करून प्रत्यक्षात ११हजार कोटी रुपयांची कर्जमाफी लाभ देण्यात आला होता. तथापि, कोरोना आपत्तीमुळे उर्वरित शेतकर्‍यांना लाभ द्यायचे राहून गेले होते. जळगाव जिल्ह्यातील २२ विविध कार्यकारी सहकारी संस्थानी शासनाकडे कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांची यादी पाठवुन ही शासनाने मंजुरी देऊन याद्या जाहीर न केल्याने व लॉक डाउन जाहीर झाला म्हणून हे शेतकरी लाभापासून वंचित होते. मार्च महिन्यात कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या परंतु २२ सहकारी संस्था या योजनेपासून वंचित राहून गेल्या. ही बाब शेंदुर्णी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांचेकडे सोसायटी संचालक मंडळांनी मांडली त्याची दखल घेऊन दिनांक २२ एप्रिल २०२० रोजी राज्यांचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना याबाबत संजय गरुड यांनी एक निवेदन देऊन लक्ष वेधले व सदर संस्थांच्या पात्र सभासदांचा तात्काळ कर्जमाफी योजनेमध्ये समावेश व्हावा म्हणून विनंती केली. तसेच वेळोवेळी पाठपुरावाही केला याची दखल घेऊन सहकार मंत्र्यांचे आदेशाने आज दिनांक ३० रोजी जिल्ह्यातील २२ विकास. संस्थांच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत.

Protected Content