भुसावळ येथे नवीन कोरोना बाधीत: सातवा रूग्ण पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथील ३८ वर्षाची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले असून हा शहरातील सातवा रूग्ण असल्याने खळबळ उडाली आहे.

भुसावळ येथे कोरोनाचा प्रकोप सुरूच असून यात आज पुन्हा एका रूग्णाची भर पडली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केल्यानुसार नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 12 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 11 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. कोरोना बाधित व्यक्ती भुसावळ येथील 38 वर्षीय महिला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 32 झाली आहे. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या 11 व्यक्तींपैकी 7 व्यक्ती या भुसावळच्या असून
4 व्यक्ती या जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे. भुसावळ शहरात आता एकूण सात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेले आहेत. यातील दोघांना मृत्यू झाला असून पाच जणांवर जिल्हा कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भुसावळ शहरातील कोरोना बाधीत महिला ही शांती नगरातील रहिवासी असून ती आधी पॉझिटीव्ह ठरलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील असल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली आहे. यामुळे आता परिसरात अजून कुणाला संसर्ग झाला आहे का ? यासाठी तपासणी करण्यात येणार आहे.

भुसावळ येथे कोरोनाचा प्रकोप वाढला असून या अनुषंगाने शहरात उद्या म्हणजेच १ मे पासून ३ मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. तथापि, हा फक्त भाजपचा कर्फ्यु असल्याचे सांगून माजी आमदार संतोष चौधरी यांनी याला विरोध केला आहे. म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाही शहरात राजकारण सुरू असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content