यावल येथील कृउबा सभागृहात भाजपाची बैठक

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आगामी होणाऱ्या निवडणूकांसदर्भात चर्चा करण्यात आली.

उपाध्यक्ष पद्दमाकर महाजन यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात होवु घातलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पक्ष बांधणी व संघटनात्मक विषयावर बैठकी विशेष चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाच्या वतीने मायक्रॉप्लन करीत मोर्चबांधणी करून पक्षाला येणाऱ्या निवडणुकी जिंकता येतील, असा विश्वास यावेळी पक्षाच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

बैठकीला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्दमाकर महाजन, तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, जि.प. सदस्या सविता भालेराव, अमोल जावळे, डॉ . कुंदन फेगडे, पं.स. गटनेते दिपक पाटील, भाजपा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, कृउबा समिती संचालक राकेश फेगडे, भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष कांचन फालक, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिग राजपुत, सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, नागेश्वर साळवे, महीला आघाडीच्या तालुकाध्यक्ष विद्याताई पाटील, स्मिता गाजरे, स्मिता साठे,वैशाली फेगडे, मालती पाटील, भाजयुवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब फेगडे आदी असंख्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते . बैठकीचे प्रस्ताविक, सुत्रसंचलन, आभार विलास चौधरी यांनी मानले.

 

Protected Content