कोरोना : जामनेरात सर्वेक्षणासाठी आठ पथकांची नियुक्ती

जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सर्वेक्षण करण्यासाठी नगरपालिकाच्या वतीने आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी दीपमाला चौरे व तहसिलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका, उपजिल्हा रुग्णालय, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जामनेरातील ज्या भागात अधिक रुग्ण आढळुन आले. तसेच मागील काही दिवसात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे त्या भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले.

तीन दिवस चालणार सर्वेक्षण
या कामी तहसीलदारांनी आठ पथकाची नियूक्ती सर्वेक्षणासाठी केलेली आहे. प्रत्येक पथकामध्ये न.पा. कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, महिला शिक्षक, पुरुष शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस विभागाकडून सर्वेक्षण पथकाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

Protected Content