मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकनाथ शिंदे सरकारच्या पहिल्या विस्तारानंतर आज रात्री मंत्रीमंडळाचे खातेवाटप करण्यात आले आहे. यात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना आधीचेच खाते मिळाले आहेत.
आज सकाळी राजभवनात शपथविधी झाल्यानंतर आजच रात्री या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यात अपेक्षेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह व अर्थ खाते सोपविण्यात आली आहेत. उर्वरीत मंत्र्यांचे खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, नगरविकास
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील महसूल
चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम
सुधीर मुनगंटीवार ऊर्जा, वन
मंगलप्रभात लोढा विधी व न्याय
रविंद्र चव्हाण गृहनिर्माण
उदय सामंत उद्योग
दीपक केसरकर पर्यावरण, पर्यटन
सुरेश खाडे सामाजिक न्याय
गुलाबराव पाटील पाणीपुरवठा
गिरीश महाजन जलसंपदा
दादा भुसे कृषी
विजयकुमार गावित आदिवासी विकास
अब्दुल सत्तार अल्पसंख्याक विकास
अतुल सावे आरोग्य
तानाजी सावंत उच्च व तंत्रशिक्षण
संजय राठोड ग्रामविकास
शंभुराज देसाई उत्पादन शुल्क
संदीपान भुमरे रोजगार हमी
या मंत्रीमंडळीत ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता हे आधीचेच खाते देण्यात आले आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे त्यांनी आधीच सांभाळलेले जलसंपदा खाते सुपुर्द करण्यात आलेले आहे.