जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज सायंकाळी प्रसिध्दीपत्रकान्वये दिले आहे.
आज शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
यासंदर्भात शासनाचे निर्देश असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व शाळा / विद्यापीठ व महाविद्यालय / शैक्षणिक संस्था यामधून मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यामध्ये सामील होतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही यावेळी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे”. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.