नोव्हेंबरमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरु होणार – जिल्हाधिकारी

रावेर प्रतिनिधी – रावेरसह इतर बंद पडलेले कापूस खरेदी केंद्र पुढील महिन्या पासून सुरु होणार असून यासाठी शासन सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लाइव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले.

रावेर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी आहे.  शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे कापूस उत्पादन सुरु झाले आहे.परंतु शासनाचे कापूस खरेदी केंद्र बंद आहे.यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की लवकरात- लवकर कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यासाठी आमचा शासनाकडे तसेच सीसीआयशी पत्रव्यवहार सुरु आहे. जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असेल की कापूस खरेदी केंद्र लवकर लवकर सुरु व्हावा  पुढच्या महिन्यात नोव्हेंबर मध्ये नक्की कापूस खरेदी केंद्र सुरु होणार आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी  थोडा धीर धरण्याचे अवाहन सुध्दा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Protected Content