दिल्लीतल्या बापाच्या वारसदारांची चिंता करू नका – चंद्रकांत पाटील

मुंबई- दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे हे तुम्हीसुद्धा पाहिलंय, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेवर पलटवार केला आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट कमिटीच्या बाहेर विकल्या जाणाऱ्या शेतमालाचा सेस गोळा करण्याचा फतवा काढला. बारामती ही काय कोणाच्या बापाची पेंड नाही. अशी टीका भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चौफुला (ता. दौंड) येथे केली होती. 

भाजप नेत चंद्रकांत पाटील यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. 

पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंयकी, दिवसभर अखंड मेहनत करणारा कामगार आमचा मायबाप आहे. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच त्यांची जर कोणी दिशाभूल करत असेल, तर त्यांच्या फायद्यासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करूच! आणि राहिला प्रश्न दिल्लीत कोणाचा बाप बसला आहे याचा, तर ते मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या वारसदारांची चिंता तुम्ही करू नये, जे विचारांनी स्पष्ट, सरळ आणि खरे असतात, त्यांचे वैचारिक वारसदार हे नेहमी तयारच असतात. तुमच्यासारख्या दृष्ट प्रवृत्तींना शह देण्यासाठी, अशा शब्दात पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

Protected Content