सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ९ ऑगस्टला ‘सामूहिक राष्ट्रगीत’ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज सायंकाळी प्रसिध्दीपत्रकान्वये दिले आहे.

आज शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

यासंदर्भात शासनाचे निर्देश असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व शाळा / विद्यापीठ व महाविद्यालय / शैक्षणिक संस्था यामधून मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यामध्ये सामील होतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही यावेळी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे”. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content