बुध्द धम्म चिकित्सा करण्याची मुभा देतो : डाॅ. विलास चव्हाण

d8024004 b0c5 47e1 a7bc 903ba8747660

 

जळगाव (प्रतिनिधी) बुध्द धम्म चिकित्सा करण्याची मुभा देतो. बुध्द म्हणतो या, पहा आणि अनुभवाची अनुभूती घ्या, अशा शब्दात अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानच्या डाॅ. जी.डी.बेंडाळे पुण्यतिथीचे व बुध्दपौणिममेनिमित्त आयोजित आनंदयात्री अण्णासाहेब बेंडाळे व्याख्यानमालेत पालेश्या महाविद्यालयाचे डाॅ. विलास चव्हाण यांनी विचार मांडले.

 

यावेळी मंचावर बेंडाळे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष किसन पाटील, मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. उदय कुलकर्णी , डी. टी.पाटील,वैश्विक मानवी मुल्ये प्रशाळेच्या संचालक डाॅ. रजनी सिन्हा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ रजनी सिन्हा यांनी केले.बेंडाळे प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष व केसीई सोसायटीचे प्रशासकिय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी बेंडाळे प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली.यावेळी सुरूवातीला संगीत विभागाचे कपिल शिंगाणे व विद्यार्थी यांनी आनंदयात्री हे गीत सादर केले. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे यांचा जीवनपट उलगडणारा माहितीपट दाखवण्यात आला.
डाॅ विलास चव्हाण यांनी बुध्दाचा धम्म विज्ञाननिष्ठ आणि प्रकाशाचा , दु:ख व तृष्णा यावर मात करत मार्ग दाखवणारा आहे. यावर सोदाहरण जातककथेतील कथा सांगत बुध्द धम्म समजावून सांगितला. यावेळी केसीई सोसायटीचे संचालक,बेंडाळे प्रतिष्ठानचे सभासद,सत्यजित साळवे,शशिकांत हिंगोणेकर, प्रा. लभाणे,प्रा. देंवेन्द्र इंगळे आदी उपस्थित होते.अध्यक्षीय मनोगतात डाॅ. किसन पाटील यांनी अण्णासाहेब यांच्या कार्याची व्याप्ती विषद केली.य्कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रणिता झांबरे यांनी तर आभार बेंडाळे प्रतिष्ठानचे सचिव डाॅ.अशोक राणे यांनी केले.

Add Comment

Protected Content