भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांना श्री नरेंद्र मोदी विचार मंच व साई निर्मल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सनातन धर्म रक्षक २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मूळचे मध्य प्रदेशातील सिहोर या गावातील रहिवासी असलेले भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा गेल्या १८ वर्षांपासून विविध कथा विशेषत : शिव पुराण माध्यमातून मुक्तीच्या मार्गाचा संदेश घराघरांमध्ये पोहोचविण्याच कार्य अखंडपणे करीत आहेत यासोबत संपूर्ण जगाला सनातन धर्म कळला पाहिजे यासाठी सुद्धा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांना जागतिक स्तरावरचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांच्या कार्याला बघून श्री नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र आणि साई निर्मल फाउंडेशन भुसावळ जिल्हा जळगाव याच्यातर्फे त्यांना सनातन धर्म रक्षक पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानपत्र शाल श्रीफळ, देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री नमो ( नरेंद्र मोदी )विचार मंचचे कथा साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक शिशिर दिनकर जावळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत सदर पुरस्कार निवड समितीचे प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील, सह कार्य अध्यक्ष देवेंद्र राजपूत, नांदेडचे चिरंजीलाल दीक्षित, यांचेसह श्री विठ्ठल सेवा समिती सीहोर मध्यप्रदेश यांचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक उपस्थित होते.