Home Cities जळगाव भाजपातर्फे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखच्या प्रतिमेचे दहन (व्हिडिओ )

भाजपातर्फे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखच्या प्रतिमेचे दहन (व्हिडिओ )

0
53


 

जळगाव, प्रतिनिधी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा भाजपा महिला आघाडी व भारतीय जनता युवामोर्चातर्फे टॉवर चौकात मेहबूब शेख याच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

औरंगाबाद शहरातील बाजयी पुरा राहण्याऱ्या खाजगी शिकवणी घेणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब इब्राहिम शेखवर करण्यात आला आहे, त्याच्या विरोधात  सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घृणास्पद घटनेचा महिला आघाडी व भारतीय जनता युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे टॉवर चौक येथे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आ. राजुमामा भोळे , महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपा सरचिटणीस महेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थिततीत भव्य निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून निषेधार्थ घोषणा व गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी महिला महानगरध्यक्ष दिप्ती चिरमाडे , युवामोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, नगरसेवक सिंधू कोल्हे , पार्वता भिल , प्रिया जोहरे, शरिफा तडवी, युवामोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, रेखा वर्मा, नितु परदेशी, शोभा कुलकर्णी ,युवामोर्चा युवती प्रमुख अबोली पाटील, सह युवती प्रमुख निकिता महाजन, भाग्यश्री चौधरी, विद्या सोनवणे, छाया सोनवणे, लता बाविस्कर ,पुजा चौधरी , राधिका वर्मा, तृप्ती पाटील , युवमोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, रियाझ शेख, गणेश महाजन ,स्वामी पोतदार चिटणीस सागर जाधव, जयंत चव्हाण, तेजस भोळे, सकीब शेख, प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील, सह सोशल मीडिया प्रमुख पुष्पेंद्र जोशी, कोषाध्यक्ष ऋषी येवले, महेश राठी, बाळू मराठे, पंकज संननसे, धीरज वर्मा, शैलश गुरव, मयूर भोई, कुणाल सोनावणे, आकाश पाटील व इ पदाधिकरी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/406228427492961

 


Protected Content

Play sound