पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | “पेंशन आपल्या दारी” या योजनेन्तर्गत पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा आणि नांद्रा पोस्ट ऑफिस मार्फत महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामाजिक अर्थसाहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना घरपोच रोख स्वरूपात पेंशन अदा करुन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यापुढे ही सदर उपक्रम १०० टक्के राबवला जाणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली. यामुळे वयोवृद्ध, दिव्यांग आणि एकल महिला यांना पेंशन कामी बॅंकेत तासंतास ताटकळत बसावे लागणार नसून घरबसल्या सदर रक्कम प्राप्त करुन घेता येईल. आधार कार्ड आणि थम डिवाइस याच्याआधारे पोस्ट कर्मचारी सदर रक्कम रोख देणार नंतर सदर रक्कम तात्काळ लाभार्थी यांचे खात्यातून पोष्ट खात्याकडे वर्ग होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राउत आणि निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत पुढाकार घेऊन योजना १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. संजय गांधी योजना शाखेचे नायब तहसिलदार भागवत पाटील, रंजीत पाटील यांनी याबाबत मोलाची भूमिका पार पाडली.