मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे आज राज्यपालांना पत्र देण्यात येणार असून यानंतर एक-दोन दिवसात नवीन सरकार सत्तारूढ होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.
राज्याच्या राजकारणात आज महत्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४१ तर अपक्ष ६ अशा ४७ आमदारांचा पाठींबा संपादन केला असून या संदर्भात आपल्या गटाची भूमिका असणारे पत्र ते राज्यपालांना सोपावू शकतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोरोनातून बरे झाले असून ते आज राजभवनात आल्यानंतर त्यांना शिंदे गटातर्फे पत्र दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शिंदे गटाने अधिकृतपणे पत्र दिल्यानंतर राज्यातील नव्या सरकारच्या गठनाच्या हालचाली सुरू होती. यात पहिल्यांदा उध्दव ठाकरे सरकार अल्पमतात आल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागेल. तर यानंतर लागलीच एक वा दोन दिवसात नवीन सरकार शपथविधी घेण्याची शक्यता आहे. यात पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे शपथ घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मविआ सरकारप्रमाणे पहिल्या दिवशी मोजके मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. तर यानंतर महिनाभरात मंत्रीमंडळाचा विस्तार करून इतारांना समावून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या भूमिकेनंतर महाराष्ट्र विकास आघाडीची नेमकी काय भूमिका असेल याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे.