जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
डॉअण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात योग दिन सर्व कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक शिक्षकेतर बंधू-भगिनीने साजरा केला. प्रमुख योगा प्रशिक्षक प्रा.डॉ.गीतांजली भंगाळे यांनी सर्वांकडून ऑनलाईन पध्दतीने विविध आसने प्रोटोकॉल नुसार व शास्त्रोक्त, सोप्या, पद्धतीनें करून घेतली. प्राचार्या यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व योगा दिनाचे महत्त्व, समजून सांगितले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अनिता कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने कार्यक्रम आयोजित केला.