जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा जिल्हा परिषद शाळेची आज शाळेच्या पहिल्या दिवशी वाजतगाजत प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आज बुधवार, दि. १५ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. निपुण भारत अंतर्गत पालक संपर्क अभियान राबविण्यात आले. पालक मेळाव्यात विद्यार्थी लाभाच्या योजना, विद्यार्थ्यांची घ्यावयाची काळजी तसेच शाळेची शैक्षणिक गुणवत्ता बाबत शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी. टी. पाटील), उपशिक्षक देवाजी पाटील यांनी पालकांना सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी पं.स. जामनेरचे ग्रामपंचायत शिक्षण विस्तार अधिकारी अमरसिंग राठोड यांनी शाळेला भेट देवून शालेय पोषण आहार, शालेय विद्यार्थी उपस्थिती, शालेय परिसर व इतर बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ म्हणून शिरा देण्यात आला. १९७ पैकी १६६ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर, उपाध्यक्ष रुपाली आगळे, सदस्य प्रकाश पाटील, शिवाजी डोंगरे, सुधाकर गोसावी, ज्योती आगळे तसेच पालक रविंद्र बावस्कर, शांताराम लोहार, निवृत्ती आगळे, गणेश डोंगरे,प्रवीण दांडगे, राहुल भोई, जयश्री आवारे, सविता भोई, छायाबाई सोनार, सुभाबाई भोई, आशा पुराणे, सुनिल दांडगे, अंगणवाडी सेविका व मदतनीस इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत शेळके यांनी केले तर आभार रामेश्वर आहेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक देवाजी पाटील, रविंद्र चौधरी, जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, श्रीमती ज्योती उंबरकर, रामेश्वर आहेर तसेच शाळेतील विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.