जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे समता सैनिक दलाच्या वतीने मंगळवार १४ जून दुपारी १२ वाजता रोजी पदाधिकारी यांच्या बैठक जिल्हाध्यक्ष विजय निकम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. यावेळी पक्ष मजबूतीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी सांगितले की, समता सैनिक दल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा दल असून खेड्यापाड्यांत, शहरामध्ये समता सैनिक दलाच्या शाखा वाढवणे आवश्यक आहे. घर तिथे समता सैनिक दल अशा पद्धतीची व्याख्या त्यांनी केली. घराघरामध्ये समता सैनिक दल पोहोचला पाहिजे. त्याचप्रमाणे घराघरामध्ये बाबासाहेबांचा विचार पोहोचला पाहिजे. त्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पोहचविणे अत्यंत आवश्यक आहे. असे सांगितले.
याप्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम, जिल्हा प्रचारक चेतन भाऊ ननावरे, महिला आघाडी जिल्हा संयोजक वैशाली हेरोडे, अनिल सोनवणे, सूर्यकांत गुरचळ, रेखा भालेराव, कपिल जाधव, विलास बोरीकर, शैलेश पाटील, संजय सपकाळे, अजय घेगटे, संजय निकम, श्रावण सपकाळे , दादाराव हेरोडे, जितेंद्र हेरोडे, भोजराज सोनवणे, जयेश खरात, अशोक अडकमोल, सविता लोखंडे जळगांव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.