जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नेरी नाका स्मशानभूमीजवळ रिक्षात बसलेल्या व्यक्तीने तरूणाच्या खिश्यातील २० हजाराचा मोबाईल चोरून नेणाऱ्या संशयिताला शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शुक्रवार १० जून रोजी रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज शेख शकील (वय-२१) रा. उस्मानिया पार्क, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नेरी नाका येथून रिक्षाने जात असतांना राकेश सुकदेव शेळके (वय-२४) रा. चिंचोली ता.जि.जळगाव या तरूणाच्या खिश्यातील २० हजार रूपये किंमतीचा मोबाईल रिक्षात बसलेल्या व्यक्तीने काढून घेत. रिक्षा चालकाने स्मशानभूमीजवळ उतरवून दिले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा उस्मानिया पार्क येथे असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर, पो.कॉ. राहूल पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी अरबाज शेख शकील (वय-२१) रा. उस्मानिया पार्क, जळगाव याला शुक्रवार १० जून रोजी दुपारी २ वाजता अटक केली. त्याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.