जळगाव/मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | केंद्र सरकारने दुसऱ्यावेळेस करकपात केली, तर राज्याने तोकड्या प्रमाणात का होईना व्हॅट कमी केला. त्यामुळे आज पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील असे वाटत होते. परंतु केंद्राने कमी केलेल्या दरातच पेट्रोल डिझेलची विक्री केली जात आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.
संसर्ग प्रादुर्भावानंतर आणि परकीय देशातील युद्धाचा परिणामामुळे बहुतांश ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दोन दिवसापूर्वी अबकारी करात कपात केली. यापूर्वी दिवाळीपूर्वी करात कपात केली होती, एप्रिलमध्ये सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद मोदी यांनी बहुतांश राज्यांना व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार इतर राज्यांनी कर कपात करीत इंधनाचे दर कमी केले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने आडमुठे धोरण स्वीकारत कोणतेही कर कपात केली नाही. त्यामुळे आजपर्यंत पेट्रोल प्रती लिटर १२० रुपयांच्या वरच मिळत होते. दोन दिवसापूर्वीच केंद्राने कर कपात केली तर राज्याने हो नाही करत पेट्रोलवर २ रुपये ८ पैसे तर डिझेलवर १ रुपये ४४ पैसे व्हॅटचा कर कमी केला आहे.
राज्य सरकारने दबावाखाली येत काही प्रमाणात का होईना कर कपात केली असली तरी जिल्ह्यात तसेच राज्यात सर्वच पेट्रोल पंपावर डीझेल पेट्रोल चे दर मात्र केंद्र सरकारने कमी केलेल्या दरातच विक्री केली जात आहे पर्यायाने नागरिकांना व्हॅट कमी होऊनही डीझेल पेट्रोल चे दर कमी झालेले नसून महागाईच्या भडक्यापासून अजूनही दिलासा मिळलेला नाही.
नागरिकांना दिलासा नाहीच !
3 years ago
No Comments