चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कामगार दिनानिमित्त आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ७० बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटीचे वाटप तर १०० कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
शासनाच्या शेकडो योजना आहेत ज्यामुळे शेतकरी – कष्टकरी – सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याची क्षमता आहे. मात्र समाजातील बऱ्याच मोठ्या घटकांपर्यंत या योजना पोहोचत नसल्याने तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देखील कुणी जात नसल्याने अश्या सर्व दुर्लक्षित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी माझे “अंत्योदय” आमदार कार्यालय कार्यरत आहे. आपल्या पुढच्या पिढ्या सुखी व शिक्षित बनविण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून घ्यावा असे आवाहन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरसेवक बबन पवार, चैतन्य तांडा उपसरपंच आनंद भाऊ राठोड, दादा भाऊ देवरे महालॅब कॉर्डिनेटर संतोष सोनवणे, जळगाव लॅब कॉर्डिनेटर चेतन धनगर, आकाश पारधी, विजय महाजन, विकास देशमुख, मीना राठोड, कोमल जगताप, डॉक्टर कल्पेश बहाळकर आदी उपस्थित होते.
सदर आरोग्य तपासणी शिबिरात शासनाच्या महालॅब मार्फत कानाची तपासणी, डोळ्यांची तपासणी, टेम्प्रेचर मोजणी, रक्तदाब मोजणी, हृदयाची तपासणी, साखरेची (शुगर) तपासणी, पोटाच्या तपासण्या (लिवर सबंधित), किडनीच्या तपासण्या, थायरॉईड तपासणी व निदान मोफत करण्यात आले. तसेच ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे अश्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेंतर्गत नामांकित रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व उपचार केले जाणार असल्याची माहिती महालॅब कॉर्डिनेटर संतोष सोनवणे यांनी दिली.