उद्या मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा श्राध्द सोहळा

यावल –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील मनवेल येथील श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या यांचा श्राध्द सोहळा उद्या सोमवार दि.१९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.

 

मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबार  १९ सप्टेंबर रोजी सोमवारी सात वाजेपासून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात  सकाळी सात वाजता आरती, आठ वाजता सेवा,  दहा वाजता होम , हवन, सेवा व दुपारी बारा वाजेपासून महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक, रात्री आठ वाजता महाआरती व रात्र भर ठिक ठिकाणाहुन आलेल्या दादा भक्त गण भजन गायनच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. मनवेल ग्रामपंचायत मार्फत व गावकरी आप आपल्या भागात स्वच्छता मोहीम राबवून गावात रागोंळ्यानी व धुनीवाले दादाजी यांच्या ध्वज ठिक ठिकाणी लावण्यात आले असून गाव भगवामय झाले आहे.

या सोहळयाकरीता महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील धुनीवाले दादाजी भक्तगण , अधिकारी , विविध राजकीय पदाधिकारी,  लोकप्रतीधी या कार्यक्रम करीता आवर्जून भेट देऊन महाप्रसादच्या आस्वाद घेतात. याठिकाणी दिवसभर भावीकांसाठी साकळी या गावात बापु धोबी या दादा भक्त गणासाठी मोफत शिरा वाटप करतात. तर महर्षि वाल्मीक मित्र मंडळ मनवेल यांचा मार्फत पोहे वाटप तर चहा वाटप व रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात येत आहे.  साकळी – मनवेल दरम्यान मोफत प्रवाश करीता वाहन व्यवस्था करण्यात येत असते. या कार्यक्रमासाठी साकळी, शिरसाड, थोरगव्हाण, पथराडे, शिरागड, पिळोदा खुर्द ,दगडी या गावातील भावीकांचे सहकार्य लाभते.

Protected Content