यावल येथे महिन्याच्या रोजदारांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

यावल , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामसेवक रुबाब महमंद तडवी यांच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महीन्यांचे संपुर्ण रोजे ( उपवास ) ठेवणाऱ्या रोजदारांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावल येथील विरार नगर मधील तडवी कॉलनीतील हजरत बिलाल मस्जिदमध्ये पवित्र रमजान महीन्यांचे रोजे ( उपवास ) ठेवणाऱ्या समाज बांधवांसाठी ग्रामसेवक रूबाब तडवी यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रूबाब तडवी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन महीन्यांच्या रोजदारांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीत अन्नदानाची सेवा केली. यावेळी त्यांना जावेद तडवी , रौनक तडवी व आदी त्यांच्या आदिवासी तरूण मित्रमंडळीनी त्यांना या इफ्तार कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी हजरत बिलाल मस्जिदचे विश्वस्त ही उपस्थित होते. या रोजा इफ्तार पार्टीला पवित्र रमजानचे संपुर्ण रोजे ( उपवास ) ठेवणाऱ्या रोजदार हे मोठया संख्येत उपस्थित होते.

Protected Content