यावल न.पा.च्या विकास कामात गैरव्यवहार; मुख्याधिकारी विरोधात चौकशीचे आदेश

यावल प्रतिनिधी । येथील नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांचे विरूध्दच्या शहरातील झालेल्या विविध विकास कामाच्या माध्यमातुन आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार केल्याने शासनाने संदर्भात  चौकशीचे आदेश सतिष कुलकर्णी उपसंचालक, नगरपरिषद संचनालय मुंबई यांनी दिले आहे.

यावल नगरपरिपदच्या माध्यमातुन शहरातील विविध विकास कामात येथील मुख्याघिकारी बबन तडवी व अभियंता सईद शेख यांनी भ्रष्टाचार  केल्याची येथील माजी नगरसेवक विजय गजरे यांनी   महाराष्ट्र शासनाच्या  नगर परीषद  संचालनालयाकडे शासन नगर विकास विभागाला तक्रारीवरून संचालनालयाकडून प्राप्त पत्रान्वये जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे  यांना दिलेल्या आदेशान्वये तक्रारीची चौकशी करून १५ दिवसात कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्याचे दिलेल्या पत्रान्वये कळविले आहे. या नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी आणी अभीयंता सईद शेख यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व कार्यवाहीची आदेश प्राप्त झाल्याने परिषदच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली असुन , या कार्यवाहीकडे यावल तालुक्याचे लक्ष लागले आहे .

Protected Content