मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । उपाशीपोटीच क्रांती घडते एवढं लक्षात घ्या त्यामुळे महागाई आवरती घ्या… महागाईवर काहीतरी बोला…अन्यथा पुढचा काळ कठीण आहे असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
मागच्या मार्चमध्ये महागाईचा दर ७.२ होता आता महागाईचा दर १४ वर पोचला आहे याचा अर्थ महागाई कधी नव्हे एवढी ७० वर्षात शिगेला पोचली आहे. ७० वर्षात कॉंग्रेसने म्हणजे आम्ही काय केले बोलणार्यांना आम्ही महागाई जागतिक बाजारात होती तेव्हा रोखून धरली होती आता जागतिक बाजारात महागाई नाहीय. पण आपल्या देशात आहे याची आठवणही जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली आहे.
पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव कुठे पोचले आहेत हे एखाद्या गृहिणीला विचारा…गाडी वापरणाऱ्या मध्यमवर्गीयाला विचारा. एकंदरीतच महागाई सर्वसामान्यांना भाजून काढत आहे. उन्हाचा चटका कमी तर महागाईचा चटका जास्त बसतोय मात्र आपण फक्त मिडिया, पेपरमध्ये, राजकीय चर्चेतसुध्दा काय पहातो आहे तर फक्त नको त्या विषयांना विषय बनवले जात आहे. एकंदरीतच महागाई कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हे केले जात आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
धर्म ही अफूची गोळी आहे ती खाल्ली की लोकं सगळं विसरतात हे कार्ल मार्क्स यांचे उदाहरणही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिले.