ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच: रेणू शर्मा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच असे नवे ट्विट आज करून शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनीं केले आहे

 

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यानंतर रात्री रेणू शर्मा यांनी सलग ट्विट् करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी ब्लॉक का केलं होत? याचा जाब विचारण्याचा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला आहे. तसेच, पोलीस जेव्हा या गोष्टीचा तपास करतील तेव्हा या सगळं काही समोर येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

गायिका रेणू शर्मा यांनी मंगळवारी धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली. तसेच, समाज माध्यमांवार दिवसभर याच गोष्टीची चर्चा सुरू होती. या प्रकारानंतर काहींनी धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले. तर काहींनी रेणू शर्मा यांची बाजू घेत त्यांना न्याय देण्याची मागणी केली.

त्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय?, असा सवाल रेणू यांनी केला. तसेच, पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलंय. पोलीस जेव्हा सखोल तपास करतील तेव्हा सगळं काही समोर येईलच असं म्हणत त्यांनी या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

 

, हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फक्त बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी हे सगळं काही होत असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांची बाजू मांडली आहे. रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्यासोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. करुणा शर्मा या रेणू शर्मा यांच्या बहीण आहेत. परस्पर सहमतीच्या संबंधामधून करुणा शर्मायांच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये असल्याचेही त्यांनी म्हटलंय. सदर दोन्ही मुलांना मुंडे यांनी त्यांचे नाव दिल्याचे सांगत सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव असल्याचं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलंय.

धनंजय मुंडे यांनी पुढे करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्याकडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचा आरोप केलाय. “२०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या,” असं मुंडे यांनी म्हटलंय. तसेच, या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, मुंडे यांच्यावर झालेल्या या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. कोणी रेणू शर्मा यांना न्याय देण्याची मागणी करत आहे. तर कणी मुंडे यांच्यावरील आोरोप बिनबुडाचे असून फक्त फसवण्यासाठी हे सगळं केलं जात असल्याचं म्हणत आहेत.

Protected Content