पुण्याच्या पोलीस आयुक्तांना माझे हातपाय तोडण्याचे आदेश ! सोमय्यांचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्याच्या पोलीस आयुक्तांना माझे हातपाय तोडण्याचे आदेश देण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना अलीकडेच पुण्यात त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली. सोमय्यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर त्यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. तसेच सोमय्या राज्यपालांच्या भेटीला गेले होते. आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

सोमय्या म्हणाले की, कोविड रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केलं. पैशासाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला. ५८ कोटींचे कंत्राट सुजित पाटकर यांना चहल यांनी दिले. हा सुजित पाटकर संजय राऊत याचा पार्टनर आहे, असा आरोप सोमय्यांनी केलाय. संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराने काळी कामं केली, असं ते म्हणाले. सुजित पाटकर याने एक नाही तर अशी सात कंत्राटे मिळवली असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, याप्रसंगी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांवरही आरोप केले. सोमय्या म्हणाले की, पुणे पोलीस आयुक्तांना माझे हातपाय तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. ते निष्पक्ष नाहीत, यामुळे त्यांची बदली करावी अशी मागणी देखील आपण केलेली आहे.

Protected Content