यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावल येथील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहुन जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा.डी.एन.मोरे, प्रा.सि.के. पाटील, डॉ.पी.व्ही.पावरा, प्रा.सुभाष कामडी, मिलिंद बोरघड़े, प्रमोद कदम व संतोष ठाकूर आदींनी उपस्थित राहुन डॉ बाबासाहेबांना आदरांजली वाहीली. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात कार्यालयाती वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे कनिष्ठ लिपिक रणविर वाघ यांच्यासह आदी कार्यालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली .