मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रामनवमीचं औचित्य साधत ‘हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया’ देत मनसेनं कुरघोडी करत शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठणाचा घाट घातला तर आदित्य ठाकरे यांनी मी “संपलेल्या पक्षाला उत्तर देत नाही” असा खोचक प्रत्युत्तर दिले आहे.
मनसेकडून शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठणानंतर मनसेचा भोंगा जप्त करत यशवंत किल्लेदारसह मनसेसैनिकांना पोलीसांनी कारवाई करत ताब्यात घेतलं. यांनतर ‘ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. असं सांगत शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई का केली ?’ असा प्रश्न मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला तर संपलेल्या पक्षाला उत्तर देत नाही, आदित्य ठाकरेंचा यांनी टोला लगावला आहे.
भोंग्यावरून मनसे विरुद्ध शिवसेनेत सुरु झालेला हा वाद इथेच संपतो कि पुन्हा नवीन वळण घेतो याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.