फेड चषक : भारतीय संघात सानिया मिर्झाचे पुनरागमन

Sania Mirza

नवी दिल्ली वृत्तसंस्था । फेड चषकाच्या आशिया झोन ग्रुप ए च्या सामन्यांसाठी भारतीय टेनिस संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा या स्पर्धेतून पुन्हा एकदा कोर्टवर उतरणार आहे. तब्बल ४ वर्षांच्या कालावधीनंतर सानिया मिर्झाची भारतीय संघात निवड झाली असून सानिया कसा खेळ करते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टपासून गेली काही वर्ष दुरावलेल्या सानिया मिर्झाने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. फेडरेशन चषकासाठीच्या युक्रेनविरुद्धच्या सामन्यात सानिया मिर्झा टेनिस कोर्टवर पुनरागमन करेल. सानिया मिर्झासोबत भारतीय संघात अंकिता रैना, रिया भाटीया, ऋुतुजा भोसले आणि करमन कौर थंडी यांची निवड झालेली आहे. सानिया आपला पहिला सामना जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेल्या नाडीया किचेनॉकविरुद्ध खेळेल. २०१६ साली सानिया मिर्झा आपला अखेरचा फेडरेशन चषकाचा सामना खेळली होती. यानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दाम्पत्याला मुलगा झाला, ज्यामुळे तिने टेनिसमधून ब्रेक घेतला होता.

Protected Content