भाजपच्या ४२ व्या वर्धापननिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या चार राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ऐतिहासिक विजय प्राप्त करीत पूर्ण बहुमतात सरकार स्थापन केले आहे. भाजपचा ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्षांच्या निर्देशानानुसार माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या नेतृत्वात ६ ते १६ एप्रिल दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी दिली आहे.

भाजपाची विचारधारा व अंत्योदयाचा संकल्प देत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील गोर-गरीब,शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता व देशसेवेसाठी कार्यरत असून भाजपाच्या वर्धापनदिन दिनानिमित्त वसंतस्मृती, भाजपा जिल्हा कार्यालय, बळीराम पेठ येथे ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत पक्ष ध्वजवंदनाचा, सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे एलइडी स्क्रीनद्वारे भाजपा कार्यकर्त्याना संबोधन लाइव्ह प्रक्षेपण, ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्यदिन शिबिर, रामनवमी उत्सव निमित्त राम मंदिराचे फलक व कारसेवक यांचा सन्मान, ११ एप्रिल -महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम, १४ एप्रिल – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मंडलात अभिवादन, १६ एप्रिल हनुमान जयंती निमित्त हुनुमान मंदिरात जास्तीत जास्त लहान मुलांना एकत्र करून हनुमान चालीसा पठन असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास सर्व जिल्हा पदाधिकारी,मंडल अध्यक्ष,विविध आघाड्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख,बूथप्रमुख व कार्यकर्त्यांनी आपआपल्या मंडलात व आपल्या बुथवर पक्षाचा ध्वजवंदन करावे व पक्ष कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमास बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे.

 

Protected Content